नागीण चवताळली! अंड्यांचे रक्षण करतानाचा VIDEO होतोय व्हायरल; अंगावर येईल काटा..

 

 

Snake Viral Video 2024 : विषारी नागाचा फोटो जरी आपल्या डोळ्यासमोर आला तरी आपली घाबरगुंडी उडते. साप, नाग, अजगर या सर्व जातींना अनेक जण घाबरतात, यात काही नवल नाही. अनेकदा सोशल मीडियावर यांचे अनेक व्हिडीओ, फोटोदेखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. नुकत्याच एक- दोन दिवसांपूर्वी परदेशातील एका अजगराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यात तो अजगर एका गाडीच्या मागच्या बाजूला अडकलेला दिसत होता. या व्हिडीओनंतर आता पुन्हा एकदा एका नागिणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती आपल्या अंड्यांचे रक्षण करताना दिसत आहे.

या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक नागीण खड्ड्यात फणा काढून बसलेली दिसत आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला तुम्ही पाहू शकता, नागिणीने फणा काढला असून ती तिथल्या मातीत असलेल्या अंड्यांचे रक्षण करत आहे. यावेळी नागीण खूप आक्रमक असल्याचे दिसत आहे, शिवाय तिच्या अंड्यांना हात लावणाऱ्यांना ती डसण्यासाठी तयार असल्याचं दिसत आहे.हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @murliwalehausla24 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करणारी व्यक्ती एक प्रसिद्ध स्नेक कॅचर आहे. हा अनेकदा त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर सापांचे विविध व्हिडीओ शेअर करत असतो. नुकत्याच शेअर केलेल्या या व्हिडीओला आत्तापर्यंत दोन मिलियन व्ह्यूज मिळाल्या आहेत. शिवाय याला आत्तापर्यंत ५० हजारांहून अधिक जणांनी लाईक केलं आहे.

 

 

Leave a Comment