BCCI ने T20 भारतीय खेळाडूंची यादी केली जाहीर

t20 world cup team list

👇👇👇👇
पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना मिळणार
हेक्टरी 55,900 रुपये, इथे यादी चेक करा

 

t20 world cup team list : 1 जूनपासून टी-20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्यात महायुद्ध होणार आहे. T20 विश्वचषकाचा पहिला सामना अमेरिका आणि कॅनडा यांच्यात होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया वर्ल्ड कपमध्ये उतरणार आहे. भारताचा पहिला सामना ५ जून रोजी आयर्लंडविरुद्ध होणार आहे. भारतीय संघाचे खेळाडू सध्या आयपीएलमध्ये व्यस्त आहेत. आयपीएलनंतर आठवडाभरात टी-२० विश्वचषक होणार आहे. टी-20 विश्वचषकासाठी टीम इंडियाच्या 10 खेळाडूंची नावे फायनल झाल्याचे मानले जात आहे. जसप्रीत बुमराह टी-२० वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मासोबत खेळणार आहे.

t20 world cup team list

आयपीएलचा हंगाम सुरू असतानाच टी-२० वर्ल्ड कपच्या चर्चेलाही वेग आला आहे. जूनमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी-२० विश्वचषक होणार आहे. त्यासाठी टीम इंडियाची निवड दोन आठवड्यांत होईल. रोहित शर्मा, राहुल द्रविड आणि अजित आगरकर यांची टी-20 विश्वचषकासंदर्भात गेल्या आठवड्यात बैठक झाली होती. काही खेळाडूंच्या निवडीवरून जोरदार चर्चा झाली. पीटीआयच्या वृत्तानुसार, टी-20 विश्वचषकासाठी 20 सदस्यीय संघाची निवड करण्यात आली आहे. विश्वचषक स्पर्धेत किमान 15 खेळाडू खेळतील अशी अपेक्षा आहे. या 20 खेळाडूंमध्ये आयपीएलमध्ये फ्लॉप ठरलेल्या खेळाडूंचाही समावेश आहे. याशिवाय राजस्थानच्या रियान परागचाही विचार करण्यात आला आहे. यशस्वी जैस्वाल, हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा यांना आयपीएलमध्ये फारशी कामगिरी करता आली नसली तरी 20 सदस्यीय संघातही स्थान मिळाले आहे.

 

👇👇👇👇
पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना मिळणार
हेक्टरी 55,900 रुपये, इथे यादी चेक करा

T20 – 15 खेळाडूंची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

फलंदाज, गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडूंचा समावेश असलेल्या 20 जणांचा चमू निवडण्यात आलाय. फलंदाजीबाबात बोलायचं झाल्यास रोहित शर्मा, यशस्वी जायसवाल, शुभमन गिल आणि विराट कोहली यांची निवड करण्यात आली आहे. रिपोर्ट्सुनासर, टी 20 विश्वचषकात विराट कोहली आणि रोहित शर्मा सलामीला खेळणार आहे. शुभमन गिल याला बॅकअप सलामी फलंदाज म्हणून संघात स्थान देण्यात येणार आहे. मध्यक्रममध्ये सूर्यकुमार यादव, रिंकू सिंह, ऋषभ पंत, केएल राहुल, रियान पराग आणि संजू सॅमसन यांना स्थान दिलेय.

 

👇👇👇👇
पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना मिळणार
हेक्टरी 55,900 रुपये, इथे यादी चेक करा

अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांचा समावेश आहे. फिरकीपटूंमध्ये युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांना स्थान देण्यात आले आहे. याशिवाय रवी बिश्नोई यांचीही निवड करण्यात आली आहे. वेगवान गोलंदाजीत जसप्रीत बुमराहचे स्थान निश्चित मानले जाते. त्याच्यासोबत मोहम्मद सिराज, आवेश खान आणि अर्शदीप सिंग यांना स्थान देण्यात आले आहे.

यष्टिरक्षक म्हणून ऋषभ पंत, केएल राहुल आणि संजू सॅमसन यांच्या नावाचा विचार केला जात आहे. त्यापैकी दोघांना स्थान मिळेल, अशी अपेक्षा आहे.

कार्तिकला जागा नाही –

हैदराबादविरुद्ध धमाकेदार ८३ धावा करणाऱ्या दिनेश कार्तिकचे नाव टी-२० विश्वचषकासाठी निवडले गेले नाही. याशिवाय वेगवान गोलंदाज मयांक यादवलाही स्थान देण्यात आलेले नाही. आर. अश्विनलाही काढून टाकण्यात आले आहे.

Leave a Comment