“बायकोसमोर सोनं आहे लोखंड..” नवऱ्याचा भन्नाट उखाणा अन् नवरी लाजली, VIDEO होतोय व्हायरल

ukhane video viral

 

👇👇👇👇👇

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

उखाणा म्हणजे लयबद्ध पद्धतीने जोडीदाराचे नाव घेणे होय. लग्न असो किंवा कोणताही शुभ

प्रसंग आवर्जून उखाणा घेतला जातो. महाराष्ट्रीय संस्कृतीमध्ये उखाण्याला अनन्यसाधारण

महत्त्व आहे. पूर्वी फक्त महिलाच उखाणा घ्यायच्या आता पुरुष मंडळी सुद्धा आवडीने

उखाणा घेताना दिसतात. सोशल मीडियावर उखाण्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत

असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. काही उखाण्याचे व्हिडओ पाहून पोट धरून हसायला येते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक नवविवाहीत तरुण त्याच्या पत्नीसाठी उखाणा घेताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. कारण या तरुणाने भन्नाट उखाणा घेतला आहे.

👇👇👇👇👇

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला नवविवाहीत जोडपे दिसेल. या जोडप्याचे नुकतेच लग्न झाले आहे. लग्नानंतरच्या पहिली अंघोळीची एक प्रथा असते. या प्रथेमध्ये नवरदेव नवरीची अंघोळ घातली जाते आणि त्यानंतर त्यांना उखाणा घेण्यास सांगितले जाते. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की नवरदेव म्हणजेच नवविवाहीत तरुण उखाणा घेत आहे. उखाणा घेताना तरुण म्हणतो, “ऊस आहे गोड, बर्फ आहे थंड, माझ्या पुजासमोर सोनं आहे लोखंड” नवरदेव जेव्हा उखाणा घेतो तेव्हा नवरी मात्र लाजताना दिसते. या तरुणाचा उखाणा ऐकून सर्वच एकच जल्लोष करतात. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. weddingbirds__ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

👇👇👇👇👇

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

सोशल मीडियावर या पूर्वी सुद्धा नवरदेव आणि विवाहीत तरुणांचे भन्नाट उखाणे चांगलेच व्हायरल झाले आहे. असाच एक व्हिडीओ मार्चमध्ये व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये नवरदेवाने उखाणा घेतला होता, ” “गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड म्हणता म्हणता आज लग्नाचा दिवस आला, आधी होतो मोकाट आता फक्त नियम पाळा… या वाघाची कधी शेळी होईल असे वाटले नव्हते मला आजपासून अक्षिता काळे समोर झुकना पडेगा साला” असाच आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये नवरदेवाने उखाणा घेतला होता, ““रस्ता अडवायला जमल्या साऱ्या बहिणी, सुकन्याचं नाव घेतो.. आवडली का तुमची वहिनी” सोशल मीडियावर भन्नाट असे उखाण्याचे व्हिडीओ व्हायरल होत असतात.

Leave a Comment